ट्वेण्टी २० रँकिंगमध्ये विराट कोहलीची घसरण

दुबई: नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या ट्वेण्टी २० रँकिंगमध्ये टीम इंडियाची विराट कोहलीची एका स्थानाने घसरण झाली आहे. विराट ट्वेण्टी २० रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. तर सुरेश रैना पाचव्या आणि युवराज सिंग सहाव्या स्थानावर आहे. रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा ब्रॅण्डम मॅक्युलम अव्वल स्थानावर आहे. तर इंग्लंडचा हेल्स दुस-या आणि ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिंच तिस-या स्थानावर आहे.

ट्वेण्टी २० रँकिंगमध्ये गोलंदाजीत एकही भारतीय गोलंदाजाला टॉप टेनमध्ये जागा बनवता आलेली नाही. गोलंदाजीत वेस्ट इंडिजचा सुनील नरेन टॉपवर, पाकिस्तानचा सईद अजमल दुसऱ्या तर न्यूझीलंडचा नॅथन मॅक्युलम तिस-या क्रमांकावर आहे.

ट्वेण्टी २० रँकिंगमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा युवराज सिंह तिस-या स्थानावर कायम आहे. तर पाकिस्तानचा सईद अजमल पहिल्या आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन दुस-या क्रमांकावर आहे.

Leave a Comment