आघाडीबाबत राष्ट्रवादीचे नरमाईचे धोरण

मुंबई : आघाडीच्या जागा वाटपाबाबत कॉंग्रेसने तत्काळ निर्णय न घेतल्यास वेगळा विचार करावा लागेल. असे काही दिवसापूर्वीच म्ह्टले होते. मात्र आता त्यांनी आघाडीबाबत थोडेसे नरमाईचे धोरण घेतले आहे. आमच्या समोर सर्व पर्याय खुले आहेत, असे इशारे देणा-या राष्ट्रवादीचा सूर आता नरमला आहे. आघाडीच्या जागा वाटपाबाबत आगामी काळात लवकरच निर्णय होईल, असे सांगत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसवर टीकाटिप्पणी करू नका, अशा सूचना आज पक्षाच्या नेत्यांना दिल्या.

येत्याा काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीच्या जागावाटपा बाबत कॉंग्रेसकडून कोणतीच बोलणी होत नसल्याने राष्ट्रवादी कॉंगेस या दोन्हीड कॉंग्रेसमध्येब अस्वस्थता आहे. निर्वाणीचे इशारे देऊनही त्याचा कॉंग्रेसवर काहीही परिणाम झालेला नाही. आपण दिलेल्या इशा-यांचा कॉंगेसवर काही परिणाम झाला नसला तरी राष्ट्रवादीचा सूर मात्र काहीसा नरमला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुन्हा बैठक झाली. लोकसभेसाठी कॉंग्रेसबरोबरच्या आघाडीतील जागा वाटपाबाबत येत्या दोन-चार दिवसांत बोलणी सुरू होतील. त्यामुळे कोणी टोकाची वक्तव्ये करू नयेत, असा सबुरीचा सल्ला शरद पवार यांनी या बैठकीत दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्रीय स्तरावर आघाडीच्या जागा वाटपाबाबत चर्चा व्हावी, असा आग्रह धरला होता; परंतु कॉंग्रेसने मात्र प्रथम राज्य पातळीवर चर्चा करा, अडचणी असतील तर केंद्रीय स्तरावरून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेदेखील आपला आग्रह सोडून राज्य पातळीवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी येत्या ४८ तासांत दोन्ही कॉंग्रेसमध्ये चर्चेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले.

माढा, शिरूर, मावळ, परभणी, जळगाव, रावेर व नगर या जागांवरील संभाव्य उमेदवारांबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. मावळमधून लक्ष्मण जगताप, नगरमधून राजीव राजाळे, जळगावमधून सतीश पाटील यांची नावे निश्चित करण्यात आली. शिरूर मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढील पेच अजूनही कायम आहे. आमदार वल्लभ बेनके यांचे नाव या मतदारसंघासाठी चर्चेत होते; परंतु त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Leave a Comment