महिला कॉन्स्टेबलची ठाण्यात आत्महत्या

ठाणे- येथील रेल्वे पोलिस ठाण्यात महिला कॉन्स्टेबल वैशाली पिंगट यांनी रिव्हॉल्वरमधून स्वत:वर गोळी झाडून रविवारी सकाळी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून हे टोकाचे पाऊल त्यांनी उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ठाणे रेल्वे पोलिस ठाण्याच्या संगणक विभागात सकाळी साडे आठच्या सुमारास वैशाली पिंगट गेल्या. तेथील लॉकरमधून त्यांनी रिव्हॉल्वर काढून स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या. त्याचा आवाज ऐकताच अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंबरनाथ येथे राहणा-या पिंगट यांचा विवाह विजय लिंगायत यांच्याशी झाला होता. लिंगायत यांचे हे दुसरे लग्न होते. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक भाल सिंग करीत आहेत.

Leave a Comment