इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, १६ जण ठार

माऊंट सिनाबंग – इंडोनेशियातील माऊंट सिनाबंग परिसरात शनिवारी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या उद्रेकात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. माऊंट सिनाबंग झ्र इंडोनेशियातील माऊंट सिनाबंग परिसरात शनिवारी ज्वालामुखीचा मोठा उद्रेक झाला. या उद्रेकात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत.

तसेच रविवारी बचावकार्यादरम्यान जवांनांना घटनास्थळी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मृतदेह मिळाले. मृत व्यक्तींमध्ये स्थानिक वाहिनीचे पत्रकार, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचा समावेश आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात तप्त लाव्हारस, विषारी वायू आणि राख बाहेर पडत आहे. पुढील चार महिने हा ज्वालामुखीचा उद्रेक चालू राहणार आहे. त्यामुळे तेथील सुमारे चौदा हजार लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे

Leave a Comment