पिंपरी – पोलिस उपायुक्तांची हुक्का पार्लरवर धाड

पिंपरी – पिंपळे सौदागर परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलमधील हुक्का पार्लरवर पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी नऊ मुली व पंधरा युवकांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर परिसरातील टीम लकलक या हॉटेलवर रात्री सव्वाअकरा सुमारास छापा टाकण्यात आला.

हॉटेलच्या तीन व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. तसेच काही जण आयटी इंजिनियर्स आहेत. या सर्वांना पिंपरी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उपायुक्त उमाप यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सुनील गाडे, फौजदार अनंत व्यवहारे, सुरेश माने, अर्जुन पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Leave a Comment