भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेकडून अटक

कोलंबो- समुद्रातील श्रीलंकेच्या हद्दीत गेल्याच्या आरोपावरून श्रीलंकन अधिकाऱ्यांनी १९ भारतीय मच्छिमारांना अटक केली असून, पाच जहाजे पकडली आहेत. जाफना डेलफ्ट या छोट्या बेटाच्या उत्तरेला काल (शनिवारी) रात्री उशिरा एकूण १९ मच्छिमारांना अटक करण्यात आली, असे श्रीलंकन नौदलाचे कमांडर कोसला वार्नाकुलसुरिया यांनी कोलंबोमध्ये सांगितले.

दोन्ही देशांमध्ये झालेल्या बोलणीनंतर अलीकडेच करण्यात आलेल्या कराराचे उल्लंघन करून भारतीय मच्छिमारांनी श्रीलंकन हद्दीत प्रवेश केल्याने त्यांना अटक करण्यात आली, असे वार्नाकुलसुरिया म्हणाले.