निवडणूक जिंकण्यासाठी मिडीयाची गरज नाही- गडकरी

नागपूर – आगामी काळात होत असलेली लोकसभेची निवडणूक जिंकण्यासाठी मला मीडियाची गरज नाही, असा टोला भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लगावला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी जनेतची कामे करावी लागतात असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

आगामी काळात नितीन गडकरी हे नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत, त्यासाठी नागपूर बूथ संकल्प महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी केजरीवाल यांचे नाव न घेता टीका केली आहे.

दोन दिवसापूर्वीच दिल्लीचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्ट नेत्यांच्या यादीत नितीन गडकरी यांचे ही नाव घेतले होते. त्यालमुळे केजरीवाल यांच्यािवर गडकरी यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनतर आता नितीन गडकरी यांनी देखील त्यांचे नाव न घेता केजरीवालवर यांच्यावर टीका केली आहे.

Leave a Comment