राजू शेट्टीना महिनाभरात ८० लाख रुपये भरण्याची नोटीस

कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपूर्वी करण्याात आलेल्या उसदराच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा खासदार राजू शेट्टी आता अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनावेळी शासकीय मालमत्तेचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या आंदोलनात झालेल्या नुकसान भरपाईसाठी राजू शेट्टी यांना कोल्हापूरच्या जिल्हाधिका-यानी नोटीस बजावली असून एक महिन्याच्या आत ८० लाख रुपये भरा, नाहीतर तुमच्या संपत्तीवर टाच आणून पैसे वसूल केले जातील अशा स्व्रुपाची नोटीस बजावण्यातत आली आहे.

या आंदोलन प्रकरणी स्वाभिमान शेतकरी संघटनेच्याा शेट्टींसह सहभागी झालेल्या अन्य ८० कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी काळात खासदार राजू शेट्टी काय भूमि‍का घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या प्रकरणात जिल्हाधिका-यानी माझी बाजूही ऐकून घेवून कारवाई करायला हवी होती असा आरोप खासदार राजू शेट्टीं यांनी केला आहे. यावेळी आंदोलन करणा-या बाकीच्या पक्षांवर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळे आता आगामी काळात त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment