मुंबई : भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे नरेंद्र मोदी व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मैत्री सर्वश्रूत आहे. मात्र राज ठाकरे यांनी ही मैत्री दूर ठेवत मोदी यांच्यावर हल्ला, चढविला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. लालबागच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात भरलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तिस-या राज्यस्तरीय महाअधिवेशनात त्यांनी मोदी यांच्यावर टीका केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात येवून नरेंद्र मोदी मोठमोठ्या सभा घेतात, मात्र शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घ्यायला कसे विसरतात, इतक्या वर्षांची युती विसरता? मुंबई हे गुजराती नागरिकांचे माहेरघर असल्याचे मोदी सांगतात. मग, येथील मराठी नागरिकांचे महाराष्ट्र हे काय सासर आहे का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या जखमांवरील खपल्या काढू नका, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा देणा-या सरकारने आता मुंबईतील मराठी माणसाला अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणीही केली. केंद्राने जैन समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. मात्र लालबाग, परळमध्ये टॉवर उभारून हाच जैन समाज येथील मराठी माणसाला त्यात मज्जाव करत आहे. त्यामुळे मुंबईतून हद्दपार होणार्याह मराठी माणसाला राज्य सरकारने अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची गरज असल्यादचेही त्यांानी यावेळी बोलताना स्पंष्ट केले.