इस्लामाबाद – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. तसेच उपचारासाठी परदेशात जाण्यासाठी करण्यात आलेली याचिकाही फेटाळून लावण्यात आली आहे. सध्या मुशर्रफ हे अटकेत असून २५ लाख रुपये भरल्यानंतर त्यांना जामीन मिळू शकेल असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
मुशर्रफ यांना सात जानेवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. याआधी २९ जानेवारीला मुशर्रफ यांच्यावरील राष्ट्रद्रोहाच्या खटल्याच्या सुनावणीला न्यायालयाकडून एका दिवसासाठी स्थगिती देण्यात आली होती. मुशर्रफ यांची १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानात सत्ता होती. मुशर्रफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा खटला सुरु आहे.