ठाकरे, सचिन, आझमींची पाणीपट्टी थकीत

मुंबई- पाणीपट्टी न भरलेल्या दोन लाख मुंबईकरांच्या यादीत दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या नावांचा समावेश आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) पाणीपट्टी न भरलेल्या लोकांची यादी नुकतीच आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

या थकबाकीदारांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अ.र. अंतुले यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे. ‘बीएमसी’ने 16 जानेवारी 2014 पर्यंत दोन लाखांहून अधिक थकबाकीदारांकडून एक हजार कोटी रुपयांहून अधिक बाकी वसूल केली आहे. ‘ही यादी 24 क्षेत्रीय कार्यालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बनविण्यात आली आहे,’ असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment