सरस्वती मुंडेंना जामीन

नवी दिल्ली – गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या आरोपातील आरोपी बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यकीय व्यावसायिक सरस्वती हिला अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. सरस्वती मुंडे आणि सुदाम मुंडे हे दांपत्य परळीमध्ये गर्भलिंग चिकित्सा आणि स्त्रीभृणहत्या असे प्रकार उघडपणे करत होते. त्यामुळे त्यांच्यावर दोन वर्षांपूर्वी कारवाई झाली होती.

हे जोडपे एवढे निर्दयी होते की, त्यांनी पाडलेले गर्भ खाण्यासाठी खास कुत्रे पाळलेले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी बराच मोठा दबाव आला, मात्र त्यांनी राजकीय नेत्यांमध्ये आपले वजन निर्माण केलेले असल्यामुळे त्यांच्यावर म्हणाव्या तेवढ्या निष्ठूरपणे कारवाई होत नव्हती. मात्र माध्यमांच्या दबावामुळे शेवटी त्यांच्यावर कारवाई झाली आणि जवळपास दीड वर्षे हे जोडपे तुरुंगात होते.

त्यांनी जामीनावर सुटण्यासाठी बरेच प्रयत्न केले, मात्र उच्च न्यायालयापर्यंत त्यांना जामीन मिळाला नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयात सरस्वती मुंडे हिला सशर्त जामीन मंजूर झाला. तिच्यावर भरण्यात आलेल्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत ती वैद्यकीय व्यवसाय करणार नाही या अटीवर तिला जामिनावर मुक्त करण्यात आले.

Leave a Comment