राज ठाकरेंवर कारवाईची माणिकराव ठाकरे मागणी

मुंबई- राज्यात टोलनाक्यांची मोडतोड करण्यासाठी कार्यकर्त्यांना भडकवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईत रविवारी संध्याकाळी झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना राज्यात कुठेही टोल न भरण्याचे आवाहन केले.

तसेच कोणी आडवे आल्यास त्यांना तुडवण्याची भाषाही राज यांनी केली. तसेच टोल न भरल्यामुळे गाड्या सोडत नसतील तर गाड्या तिथेच उभ्या करा. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली तरी चालेल, असेही ते म्हणाले होते. राज यांच्या भाषणानंतर राज्यात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाक्यांवर मोडतोड करुन टोल वसुली बंद पाडली. सोमवारीसुद्धा हाच प्रकार ठिकठिकाणी सुरु आहे. केवळ कार्यकर्त्यांना दोषी न धरता त्यांना भडकवणा-या राज ठाकरे यांच्यावरही कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

Leave a Comment