वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्याची तोडफोड

मुंबई – वांद्रे-वरळी सी लिंकवरील टोलनाक्याची आज (मंगळवार) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘टोल वसुलीचे कारण समजल्याशिवाय राज्यातील एकाही नाक्‍यावर टोल भरायचा नाही. टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा,” असा आदेश दिल्यानंतर राज्यभर टोलनाक्याची तोडफोड करण्यात येत आहे. सोमवारी राज्यातील विविध शहरातील सुमारे 22 टोलनाक्यांची तोडफोड केली होती.

आज सकाळी कप्तान मलिक यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी सी लिंकवरील टोल नाक्यावर जात तेथे तोडफोड केली. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी टोलनाक्यावर तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment