सनिया मिर्झा, पेस, बोपन्नाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

मेलबर्न – ऑस्ट्रेलिया ओपनच्या भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा, लिएंडर पेस आणि रोहन बोपन्नाने विजयी मोहीम कायम ठेवली आहे. तिघानेही ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सानियाने झिम्बाव्वेच्या कारा ब्लॅकसोबत शानदार विजय मिळवला. महिला खेळाडू सानियाने अवघ्या ७२ मिनिटांत अंतिम आठमधील स्थान निश्चित केले.

दुसरीकडे या सातव्या मानांकित जोडीने कॅनडाच्या इयुगेनी बुचार्ड आणि रशियाच्या वेरा दुशेविनावर मात केली. या जोडीने ७२ मिनिटांत ६-४,६-३अशा फरकाने विजय मिळवला. आता या जोडीचा सामना दुहेरीतील बलाढ्य सारा इराणी व राबर्टा विन्सी या जोडीशी होईल.

मिश्र दुहेरीत लिएंडर पेस व डॅनियला हंतुचोवासोबत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या जोडीने महेश भूपती-एलेना वेस्नीनाला पराभूत केले. पुरुष दुहेरीतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर रोहन बोपन्नाने पराभवाला दूर सारून मिश्र दुहेरीच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. त्याने स्लोव्हाकियाच्या कॅटरिना सबरेतनिकसोबत सामना जिंकला. या जोडीने एश्ले बार्टी-जॉन पियर्सवर ७-६,७-५ ने मात केली. आता या जोडीला उपांत्यपूर्व फेरीत जर्मिला गाजदोसोवा-मॅथ्यू एबडेनच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

Leave a Comment