न्यूझीलंडचा गोलंदाज अॅयडम मिल संघाबाहेर

हॅमिल्टन – न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज अॅडम मिलने दुखापतग्रस्त झाल्याने भारताविरुध्द सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. मिलने बाहेर गेल्याने न्यूझीलंड संघाला धक्का बसला आहे. त्याच्या जागी आता संघात नवीन खेळाडूची निवड होणार आहे.

मिलनेच्या जागी हामीश बेनेटचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. पाच एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील रविवारी नेपियरमधील पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंडने जिंकला. २१ वर्षीय मिलने न्यूझीलंडकडून आतापर्यंत सात एकदिवसीय सामने खेळला आहे. पण त्याने त्याच्या वेगवान गोलंदाजीने अनेकांना प्रभावित केले आहे.

नुकत्याच संपलेल्या वेस्टइंडिज विरुध्दच्या मालिकेत त्याने १५३ किलो मीटर वेगाने गोलंदाजी केली होती. सोमवारी केलेल्या एमआरआय चाचणीमध्ये मिलनेच्या पोटाचे स्नायू दुखावल्याचे दिसून आले. त्याला तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडयांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या भारताविरूद़धच्या मालिकेस मुकावे लागणार आहे.

Leave a Comment