मनसे नगरसेवकांची राज ठाकरे घेणार झाडाझडती

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून मनसेचे प्रमुख राज ठाकरे पक्षातल्या विविध घटकाचा आढाव घेण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरे आज नाशिकमधील मनसे नगरसेवकांची मुंबईत झाडाझडती घेणार असल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशांनंतर नगरसेवक आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

नाशिकमधील सर्व नगरसेवकांची राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर बैठक होणार आहे. यामध्ये नगरसेवकांनी दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. नाशिकमधल्या विकासकामांवरून काही दिवसांपूर्वीच राज ठाकरें यांनी महापौर यतीन वाघ यांना चांगलेच फटकारलं होते. त्यामुळे त्यांची खुर्चीही धोक्यात आली होती. आता नगरसेवकांसोबत चर्चा करुन कामांचा आढावा राज ठाकरे हे घेणार आहेत.

त्याचबरोबर आगामी निवडणुकीच्या दृष्टीने कोणती कामे तातडीने हाती घेऊन मार्गी लावली पाहिजेत, याचे धडेही राज ठाकरे नगरसेवकांना देणार आहेत. त्या मुळे आगामी काळात या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.