शीतल म्हात्रे प्रकरणः ठाकरेंनी नाही महिला आयोगाने घेतली दखल

मुंबई – शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत असल्याने शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची तयारी करणाऱ्या नगरसेवक शीतल म्हात्रे यांच्या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे. या संदर्भात आयोगाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्याचे आणि १० दिवसात अहवाल देण्याचे निर्देश दिले आहे. बातम्यांची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना पत्र पाठविले आहे.

शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांच्याकडून आपल्याला मानसिक त्रास होत आहे, म्हणून आपण शिवसेना नगरसेवकपदाचा राजीनामा देणार आहोत, असं नगरसेवक शीतल म्हात्रे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, रात्री उशिरा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा पाठिमागे घेतला. स्थानिक नेतृत्वाकडून होणार्याह छळाबाबत पक्षप्रमुखांकडेही सुनावणी होत नसल्याने ताण वाढूननगरसेविका शीतल म्हात्रे या बुधवारी चक्कर येऊन कोसळल्या.

रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र एवढे नाट्य घडल्यानंतरही पक्षप्रमुख दखल घेत नसल्याने म्हात्रेंनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त होते. दहिसर येथील नगरसेविका शीतल म्हात्रे, भाजपाच्या मनीषा चौधरी आणि डॉ. शुभा राऊळ यांनी स्थानिक नेतृत्वाविरोधात उठाव केला आहे. याप्रकरणी पालिकेत आवाज उठविण्यात आला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने या नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत मीडियाकडे धाव घेतली.

डॉ. राऊळ यांच्या सोशल मीडियावरील खरमरीत पोस्टनंतरही ैमातोश्रीैने आपले डोळे बंद ठेवले होते. मीडियाने हे प्रकरण लावून धरल्यानंतर रात्री उशिरा सेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी म्हात्रे यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा तुर्तास मागे घेतला.

Leave a Comment