वजनासाठी दारूवर लक्ष ठेवा

वजन वाढत चालल्यामुळे सावध होणार्‍या आणि ते वाढू नये यासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांना, ते मद्यपान करत असतील तर शास्त्रज्ञांनी त्यांना आपल्या मद्यावर लक्ष आणि त्यातल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. कारण अल्कोहोल हे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. असे त्यांचे म्हणणे आहे. वजन वाढू नये यासाठी कमी उष्मांकाचे अन्न खाल्ले पाहिजे आणि आपण खात असलेल्या अन्नामध्ये किती उष्मांक आहेत आणि किती चरबी आहे याचा विचार केला पाहिजे असे सांगितले जाते. कारण चरबीयुक्त किंवा स्निग्ध पदार्थांमध्ये उष्मांकाचे प्रमाण जास्त असते. परंतु शास्त्रज्ञांना आता असे आढळले आहे की अधिक उष्मांकाच्या बाबतीत अल्कोहोलचा क्रमांक ङ्गॅटस्युक्त किंवा स्निग्ध पदार्थांच्या खालोखाल आहे. म्हणजे अती मद्यसेवनानेसुध्दा वजन वाढू शकते.

वर्ल्ड कॅन्सर रिसर्च ङ्गंड या संस्थेने अल्कोहोलचे काही गुणधर्म शोधून काढले आहेत आणि एखादा मद्यपी दिवसभरातून जेवढे उष्मांक घेतो त्याच्या दहा टक्के उष्मांक त्याच्या मद्यातून त्यांना मिळत असतात असे दाखवून दिले आहे. एखादा माणूस दोन मोठे चॉकलेट किंवा दोन मोठी बिस्किटे खातो तेव्हा त्याला जवळपास २०० कॅलरीज किंवा उष्मांक मिळत असतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणार्‍यांनी चॉकलेट ङ्गार खावू नयेत असे सांगितले जात असते. मात्र अशा लोकांनी चॉकलेट खाणे टाळले आणि त्याऐवजी एक मोठा दारूचा प्याला रिचवला तर त्याच्या पोटात त्या चॉकलेटमधून मिळतील एवढेच उष्मांक मिळतात आणि या ज्यादा कॅलरीज पचवण्यासाठी त्याला किमान अर्धा तास अतिशय वेगाने चालावे लागते.

अनेक लोक मोजूनमापून जेवतात, आहाराच्या बाबतीत दक्ष असतात. परंतु आपल्या दिवसभरातल्या अन्नाच्या कॅलरीज मोजताना ते त्या कॅलरीजमध्ये दारूचाच नव्हे तर अन्य कोणत्याही पेयाचा समावेश करत नाहीत. त्यामुळे ते भरपूर खातात आणि दारूही पितात. तेव्हा खाण्यातून आणि दारूतून अशा दोन्ही मार्गांनी त्यांच्या शरीरात अधिक उष्मांक जातात. दारू पिणारा माणूस ती पिल्यानंतर ङ्गिरायला जाऊ शकत नाही, खेळू शकत नाही, व्यायाम करू शकत नाही त्यामुळे त्याच्या कॅलरीज त्याच्या वजनात परिवर्तीत होतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment