मायकल शूमाकर आयुष्यभर कोमातच राहण्याची शक्यता

जर्मनी: फॉर्म्युला वनचा बादशाह मायकल शूमाकर शस्त्रक्रिया झाल्यानंतर गेल्या १८ दिवसांपासून कृत्रिम कोमात आहे. गेल्या काही दिवसांपासून तो कोमात असल्यानने आयुष्यभर कोमातच राहण्याची शक्यता काही डॉक्टरांने वर्तवली आहे. आयुष्यभर कोमातच राहण्याची भीती सध्या जर्मनीमध्ये पसरत आहे. जर्मनीच्या वृत्तपत्रांचे मथळे शुमाकरविषयीच्या या दुर्दैवी बातमीनेच भरलेले दिसत आहेत.

जर्मनीतील काही न्युरॉलॉजिकल एक्सपर्टनी मायकलच्या प्रकृतीविषयी बातचीत केली. यावेळी डॉक्टरांनी शुमाकरची सध्याच्या परिस्थितीनंतर तो आयुष्यभर कोमात राहण्याची चिंता व्यक्त केली आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर शुमाकर गेल्या् अठरा दिवसांपासून कृत्रिम कोमात आहे. कृत्रिम कोमामध्ये जास्तीत जास्त ८ ते १५ दिवसांसाठी ठेवले जाते. मात्र शुमाकरला अजूनही कोमातून बाहेर काढण्यात आलेले नाही, यामुळे त्याची दुखापत अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याचे कळते. त्यारमुळे तो कोमातून बाहेर निघणार की नाही याबाबत अनिश्चीेतता आहे.

याबाबत फ्रान्समधील ग्रेनोबेल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी कोणंतही भाष्य व्य्क्तब केले नाही. गेल्यात काही दिवसांपासून शुमाकरच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नसल्याने त्याच्या तब्यतेबाबतची भीती आणखीनच वाढत आहे.