नाशिक – २००९ च्या विधानसभा निवडणुकावेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना नाशिकमध्ये सातपूर पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी चांडक यांच्याणशिवाय चौघांनी यापूर्वीच जामीन मिळवला आहे. मात्र, चांडक यांना जामीन न मिळाल्यांने त्यांना अटक करण्यात आली आहे.
२००९ च्या विधानसभा निवडणुकावेळी झालेल्या पोस्टरबाजी प्रकरणामध्ये मनसे आमदार नितीन भोसले यांच्यासह पाच जणांची नावे होती. मात्र, यातील चौघांनी यापूर्वीच अटकपूर्व जामीन घेतला आहे. चांडक यांनी जामीन न घेतल्याने त्यांना अटक झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक यांना करण्या्त आलेल्या अटकेमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मनसेने केला आहे. भुजबळांकडे अंगुलीनिर्देश करत त्यांच्या दबावामुळे अटक झाल्याचा आरोप मनसे आमदार वसंत गिते यांनी केला आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने मनसेला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचे चांडक यांनी म्हटले आहे.