मेलबर्न – ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत चार वेळेसचा चॅम्पियन सर्बियाचा नोवाक योकोविक आणि जगातली नंबर वन महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने त्यांची विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. ऑस्ट्रेलियांतील या सामन्यात जबरदस्त गरमी असताना देखील दोघांनी विजय मिळवले आहेत.
या स्पर्धेत योकोविक सलग चौथ्यांदा किताब जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याने संयमी कामगिरी करताना अर्जेंटिनाच्या लियानार्दो मेयरविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-०, ६-४, ६-४ अशा सरळ सेटमध्येा त्यांवनी विजय मिळवला. या संपूर्ण सामन्यात मेयरला एकदाही दमदार आव्हान सादर करता आले नाही. आता आगामी काळात होत असललेल्याे तिस-या फेरीत योकोविकचा सामना ३० वा मानांकित रशियाच्या दिमित्री तुर्सुनोवशी होणारआहे. या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पाच वेळेसची चॅम्पियन असलेल्या सेरेनाने सर्बियाच्या वेस्ना डोलोनला ६-१, ६-२ने हरवले. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य फेरीत हा तिचा ६० वा विजय ठरला. यासोबत तिने आधुनिक टेनिसच्या युगात या स्पर्धेत सर्वाधिक सामने जिंकण्याच्या मार्गरेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी केली. महिला गटात अव्वल मानांकित सेरेनाशिवाय मागच्या वेळेसची उपविजेती चीनची ली ना आणि नववी मानांकित जर्मनीच्या अँजोलिक कर्बर यांनीसुद्धा तिस-या फेरीत विजय मिळवला. महिला गटातील चीनच्या लीने स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचला ६-०, ७-६ ने मात दिली.