देवास – बँक नोट प्रेस देवास येथ नोटा छपाईसाठी आणखी एक लाईन सुरू करण्यात येणार असल्याचे भारत प्रतिभूती मुद्रण मुद्रा निर्माण निगम लिमिटेडचे प्रमुख अधिकारी एस.एस.राजा यांनी येथील कार्यक्रमात बोलताना सांगितले. देवासबरोबरच नाशिक येथील मुद्रण प्रकल्पातही जादा लाईन सुरू करण्यासही मंजुरी मिळाली असल्याचे राजा यावेळी म्हणाले.
देवास येथील नवीन लाईनमुळे ४० ते ५० कोटी जादा नोटा छापणे शक्य होणार आहे तसेच २५० जणांना रोजगारही मिळू शकणार आहे. येथे १०० रूपये,५०० रूपयांच्या नोटांची छपाई केली जाते तसेच निकड असल्यास २० रूपयांच्या नोटाही छापल्या जातात. सध्या येथे वर्षाला १४० ते १६० कोटी नोटा छापल्या जातात. मात्र नोटांसाठीची मागणी वाढत असल्याने उत्पादनात वाढ करणे गरजेचे बनले होते असेही राजा यांनी सांगितले.