अॅपलने त्यांचा आयफोन ४ ( ८जीबी) भारताता रिलाँच करण्यात येत असल्याचे जाहीर केले असून हा फोन ग्राहकांना १५ हजार रूपयांताच मिळू शकणार आहे. आपली आयफोन ५ सी आणि ५ एस मॉडेल्स भारतात लाँच करताना आयफोन ४ चे उत्पादन बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.मात्र नवीन माहितीनुसार भारतीय बाजारात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी आणि कमी झालेली विक्री पुन्हा मुळ पदावर आणण्यासाठी आयफोन ४ रिलाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वर्षीच अॅपलने आयफोन ४ साली बायबॅक योजना प्रचंड खर्च करून राबविली होती. मात्र त्यामुळे कंपनीची विक्री ४०० टक्क्यांनी वाढली होती. आयफोन ४ जुने मॉडेल असूनही त्याला ग्राहकांकडून आलेली प्रचंड मागणी पाहून अॅपलने भारतीय बाजारासाठी आणखी एक योजना आणली आहे. त्यानुसार फोर एस बेस मॉडेल जुना स्मार्ट फोन देऊन ग्राहक खरेदी करू शकणार आहेत. त्यावर ग्राहकाला ५ हजार रूपयांची सूट दिली जाणार आहे. या फोन खरेदीसाठी इएमआय आणि बायबॅक या योजनाही लागू आहेत. सध्या या फोनची बाजारातील किमत २३ हजार रूपये आहे.