
मुंबई – गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या समवेत सुमारे १ लाख लोक ए मेरे वतन के लोगो हे गीत २७ जानेवारीला गाणार आहेत. या कार्यक्रमासाठी देशभरातून नामवंत गायक येणार आहेत तसेच भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेही हजर राहणार आहेत. २७ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता शहीद गौरव समिती- लोढा फौंडेशनतर्फे हा कार्यक्रम महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे.
