संजय दत्तने पुन्हा ३० दिवसाची रजा वाढवून मागितली

मुंबई – सध्या संचित रजेवर असलेल्या अभिनेता संजय दत्तने पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे आणखी ३० दिवसांची रजा वाढवण्याची मागणी केली आहे. यासाठी संजयने तीन दिवसांपूर्वीच अर्ज दाखल केला. असून त्याामध्ये त्यािने पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण पुढे केले आहे. त्याच्या रजेच्या अर्जावर प्रशासनाने आतापर्यंत कोणताच निर्णय घेतलेला नाही.

सहा डिसेंबरला संजयचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. मान्यताच्या आजारपणाचे कारण देऊन संजय २१ डिसेबरला पॅरोलच्या सुट्टीवर तुरुंगाबाहेर पडला होता. मात्र संजयने पत्नीला टीबी आहे असे सांगत रजा वाढवण्यात यावी अशी मागणी केली आहे. संजयची पत्नी मान्यता हिच्यावर शुक्रवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. मान्यताला टीबी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळेच अभिनेता संजयदत्तने पत्नी मान्यताच्या आजारपणामुळे आणखी ३० दिवसांची रजा वाढवण्याची मागणी केली आहे. १९९३ साली मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी संजयला न्यायालयाने दोषी ठरवले आणि त्याला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. सध्याष येरवडा तुरगात संजय दत्त् सजा भोगत आहे.