आर. अश्विनला पॉली उम्रीगर पुरस्कार

मुंबई : २०१२-१३ वर्षासाठी देण्यालत येणा-या वार्षिक पुरस्कारांची घोषणा बीसीसीआयने केली आहे. टीम इंडियाचा ऑफस्पिनर आऱ अश्विनला भारताच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटरसाठीच्या पॉली उम्रीगर पुरस्काराने सन्मानित करण्यालत आले आहे. पाच लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्या्त येणार आहे.

त्याशिवाय रणजी करंडकातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंना दिला जाणा-या लाला अमरनाथ पुरस्कारासाठी अभिषेक नायरची निवड झाली आहे. २०१२-२०१३ या वर्षातल्या सर्वोत्तम सर्वसाधारण कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनला सन्मानित करण्यात येणार आहे.

त्याशिवाय बापू नाडकर्णी, फारुख इंजिनियर आणि दिवंगत एकनाथ सोलकर यांची बीसीसीआयनं विशेष गौरवमूर्ती म्हणून निवड केली आहे. बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा मुंबईच्या ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे. २०१२-२०१३ या वर्षातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

Leave a Comment