अजित पवारांकडून पुन्हा दिरंगाईचा उल्लेख

पुणे: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कामास उशीर करतात असा आरोप केला जात आहे. त्याहतच पुन्हाप राज्यात निर्णय घेण्यासाठी उशीर होतो असे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. पुण्यातील ‘मराठी बांधकाम व्यावसायिक परिषदे’च्या कार्यक्रमात बोलतांना अजित पवारांनी दिरंगाईचा उल्लेख केला आहे. पण यावेळी अजित पवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव घेणे टाळले असले तरी त्यांच्याा बोलण्याचा रोख मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यांकडेच होता, असे बोलेले जात आहे.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून अनेक नव्या धोरणांमुळे आणि नियमांमुळे निर्णय घेण्यात वेळ लागतो असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावळी सांगितले. याशिवाय मोठ्या बांधकाम प्रकल्पांसाठी पर्यावरणविषयक परवानगी दिल्लीतून का आणावी? असा सवालही त्यांनी विचारला आहे. हे निर्णय राज्याला आणि शक्य झाल्यास जिल्हास्तरावर घेण्याची परवानगी द्या मागणीही त्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे कामास उशीर करतात असा आरोप काही दिवासापूर्वी झालेल्याा बैठकीत करण्याात आला होता. जात आहे त्यामुळं अजित पवारांचा दिरंगाई आणि अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरचा राग अजुनही कायम असल्याचे चित्र आहे.

Leave a Comment