
मुंबई -आयकर विभागाच्या तपास पथकाने करचुकवेगिरीच्या संशयावरून यश बिर्ला ग्रुपच्या मुंबई आणि दिल्लीतील २० ठिकाणांवर एकाचवेळी छापे घातले आहेत. यश बिर्ला ग्रुपमधील पाच कंपन्यांतील अकौंट बुक्स आयकर अधिकार्यांनी ताब्यात घेतली असून येत्या दोन तीन दिवसांत करचुकवेगिरीसंबंधाचे चित्र स्पष्ट होईल असे वरीष्ठ अधिकार्यांनी सांगितले. मात्र कोणत्या कंपन्यांच्या कार्यालयावर हे छापे घातले त्याची माहिती देण्यास नकार दिला.
