तेलंगणात मदर तेलंगण सोनियांचा ९ फुटी पुतळा

तेलंगणा – येथील काँग्रेस लिडर शंकर राव यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा ९ फुटी पुतळा तेलंगण तल्ली म्हणजे तेलंगणाची आई या नावाने तयार केला असून तो बंगलोर हैद्राबाद हायवेवरील एका ठिकाणी बसविण्यात येणार आहे. ही जागा शंकर राव यांच्या मुलीच्या मालकीची आहे. नऊ फुटांचा हा पुतळा ब्राँझ मध्ये बनविण्यात आला असून त्याचे वजन आहे ५०० किलो. शंकर राव यांच्या सांगण्याप्रमाणे या पुतळ्यासाठी आलेला खर्च त्यांनी स्वतःच्या खिशातून केला आहे.

शंकर राव म्हणतात स्वतंत्र तेलगंणाला मान्यता देऊन सोनियाजींची आमच्यावर मोठेच उपकार केले आहेत आणि त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या या उपकारांसाठी मी निदान इतके तरी करू शकतो. त्या आमच्यासाठी देवताच आहेत आणि तेलंगणातील नागरिक त्यांचे आभारी आहेत. आमच्या राज्यातील नागरिकांना सोनियाजींची प्रार्थना करता यावी आणि त्याच्यासंबंधीचा आदर व्यक्त करता यावा यासाठी हा पुतळा उभा केला जात आहे. यात अंधश्रद्धेचा भाग नाही. मला नेहमीच नेहरू गांधी घराण्याविषयी आदर होता. स्वतंत्र तेलंगणासाठी सोनियांनी काय केले हे सर्वांना कळायला हवे यासाठी त्यांचा पुतळा उभा करणे गरजेचे होते.

Leave a Comment