मायक्रोमॅक्सचा लॅपटॅब सादर

सर्वात मोठा टेक इव्हेंट समजल्या जाणार्‍या लास वेगास येथील कंझ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो सीइएस २०१४ मध्ये पहिल्याच दिवशी सोनी, सॅमसंग व मायक्रोमॅक्सने आपले स्मार्टफोन, टॅब्लेट आणि लॅपटॉप सादर केले आहेत. भारतीय स्मार्टफोन उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्सने या शो मध्ये ड्युएल ऑपरेटिंग सिस्टीमसह असलेला लॅपटॅब सादर केला असून त्याची किंमत आहे १९९०० रूपये. हा लॅपटॅब फेब्रुवारीत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या निमित्ताने मायक्रोमॅक्स प्रथमच आंतरराष्ट्रीय बाजारात उतरले आहेत.

हा लॅपटॅब लॅपटॉप म्हणून तसेच टॅब्लेट म्हणूनही युजर वापरू शकणार आहेत. यात विंडोज ८ आणि अड्राईड जेलीबिन अशा दोन ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आल्या आहेत. १०.१ इंची स्क्रीनच्या या लॅपटॅबला २ जीबी रॅम, २ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, वायरलेस की बोर्ड सुविधा असून त्याची मेमरी ३२ जीबी आहे. ती ६४ जीबी पर्यंत वाढविता येणार आहे.