शरद पवारांची जागा अजित पवार लढवणार?

मुंबई – कृषीमंत्री शरद पवारांनी लोकसभा लढवण्यास नकार दिल्यावर, आता माढा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे. या बैठकीत अजित पवारांच्या उमेदवारीबाबत संकेत मिळत आहेत.

अजित पवारांनी निवडणूक लढवली आणि ते निवडून आले, तर पवारांच्या कुटुंबात तीन खासदार पाहायला मिळतील. राष्ट्रवादीच्या बैठकीत जुन्या जाणत्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे संकेतही देण्यात आलेत. याच नेत्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

शरद पवार राज्यसभा निवडणूक लढवणार असल्याने माढा लोकसभा मतदार संघातून कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच ठिकाणी अजित पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment