
न्यूयॉर्क – प्रंचड बर्फवृष्टी, वेगवान वारे आणि शून्याखाली गेलेले तापमान यामुळे न्यूयॉर्क गर्व्हनर आंड्र्यू क्युमो यांनी न्यूयॉर्क राज्यात आणीबाणी जाहीर केली असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे तसेच प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. न्यूयॉर्क राज्यात आलेल्या या संकटामुळे राज्यातील विविध विमानतळावरून सुटणार्या सुमारे २ हजार फ्लाईट रद्द करण्यात आल्या असल्याचेही समजते. विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी ब्लँकेट, कॉट आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विमानतळ प्रशासनाकडून केला जात आहे.
