शूमाकरचा ४५ वा वाढदिवस, मात्र प्रकृती गंभीरच

ग्रॅनोबल – फॉर्म्युला वनचा लिजंड खेळाडू मायकेल शूमाकर शुक्रवारी आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. मात्र तो अद्यापींही कोमातच आहे. त्याच्या प्रकृतीविषयी त्याचे कुटुंबिय आणि उपचार करणारे डॉक्टर्स यांनी मौन बाळगले आहे. कुटुंबियांनी यावेळी तो मरणाबरोबरची लढाई नक्कीच जिंकेल अशी आशा मात्र व्यक्त केली आहे.

रविवारी आल्प पर्वतराजीत स्क्रीईंग करताना खडकावर डोके आपटल्याने शूमाकर गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर आत्तापर्यंत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत मात्र तो कोमातून बाहेर आलेला नाही. त्याच्या वाढदिवसामिमित्त फेरारी एफ वन टीमने ग्रनोबेल रूग्णालयासमोर आज मूक प्रार्थना केली. जगभरातील मिडीया शूमाकरच्या तब्येतीविषयी माहिती मिळावी यासाठी रूग्णालयावर दबाव आणत असल्याचे सांगितले जात आहे

शूमाकरला अपघात झाला तेव्हा त्याच्याबरोबर त्याचा १४ वर्षांचा मुलगा आणि कांही मित्रही होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शूमाकर खडकावर आदळला तेव्हा त्याच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले व त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

Leave a Comment