केजरींवाल योग्य मार्गावर- अण्णा हजारे

राळेगण – अरविंद केजरीवाल योग्य मार्गावर आहेत मात्र त्यांना अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक आणि केजरीवाल यांचे गुरू अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांना अण्णांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिकला. त्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.

अण्णा म्हणाले की त्यांनी विश्वासदर्शक ठराव येण्याअगोदरच केजरीवाल तो जिंकतील अशी खात्री व्यक्त केली होती. काँग्रेसने आता पक्षाला दिलेला पाठिबा काढला तर जनतेत चुकीचा संदेश जाईल असे सांगून अण्णा म्हणाले की आता यापुढे प्रत्येक राज्याने लोकपाल नियुक्त करावा यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि त्या कामी अरविंदने लक्ष घातले पाहिजे. राईट टू रिकॉल आणि राईट टू रिजेक्ट या दोन्ही साठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे आणि जनजागृतीसाठी ते पुन्हा लवकरच देशव्यापी दौर्‍यावर जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.