
मुंबई – बहुचर्चित ह्यआदर्शह्णघोटाळ्याचा चौकशी अहवाल अखेर शासनाच्या वेबसाईटवर टाकण्यात आला आहे. या अहवालामुळं काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हिवाळी अधिवेशनात सरकारनं हा अहवाल फेटाळला होता. पण भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयानं देशभर काहूर माजलं आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही या चौकशी अहवालबाबत पुनर्विचार करा, अशी भूमिका घेतली होती.
