विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी संपेल – विजय पांढरे

सोलापूर – आम आदमी पक्ष (आप) हा जनतेचा पक्ष आहे. भ्रष्टाचार झाडूने साङ्ग करणार्‍यांचा पक्ष. सत्तेच्या जोरावर भ्रष्ट राजकारण यापुढे चालणार नाही. आता हीच वेळ आहे चोरांना त्यांची जागा दाखविण्याची. आप आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज असेल. लोकांचेच प्रतिनिधी निवडणुका लढवतील. इतर ठिकाणी सोडा आता बारामतीतून जिंकून दाखवा, असे खुले आव्हान शरद पवार यांचे नाव घेता आपचे नेते, निवृत्त मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी रविवारी येथे दिले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या किर्लोस्कर सभागृहात सायंकाळी आपची सभा झाली. त्यात ते बोलत होते. श्री. पांढरे म्हणाले, सत्ता परिवर्तन नव्हे तर व्यवस्था बदलण्यासाठी या लढ्यात आम आदमी उतरत आहे. सिंचन घोषाळा ७० हजार कोटींचा असून हे प्रकरण सीबीआयपर्यंत नेले जाईल. लोकपालांकडे सर्वप्रथम याच घटनेची तक्रार करण्यात येणार आहे. या चोरांनाच आता माहीत नाही लोकपाल म्हणजे काय? सह्या करून मोकळे झालेत. ,

मोदी लाट खोटी
पुढील विधानसभेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष साङ्ग झालेली दिसेल. मोदी लाटेचा तर विचारच करू नका. त्या लाटेची चर्चा खोटी आहे, हे दिल्लीनेच दाखवून दिलेय असे ते म्हणाले.