राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्याने फेकली हसन मुश्रीफ यांच्या अंगावर शाई

बुलडाणा – बुलडाणा येथील महसूल विभागाच्या एका उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भर सोहळ्यात राष्ट्रवादीच्याच कार्यकत्यार्ने शाई फेकून सरकारचा निषेध केला. शाई फेकणाºया कार्यकर्त्याचे नाव नामदेव डोंगरदिवे असे असून तो राष्ट्रवादी अपंग सेलचा जिल्हाध्यक्ष आहे.

थेट व्यासापीठावर जात नामदेव डोंगरदिवे यांनी मुश्रीफ यांच्या अंगा – तोंडावर शाई ओतली. भर कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या कार्यकत्यार्नेच असे कृत्य केल्याने उपस्थितींना चांगलाच धक्का बसला. याआधी दिल्लीमध्ये अनेक नेत्यांवर चप्पलफेकी सारखे प्रकार घडले आहेत. आता राज्यातही असे प्रकार घडू लागल्याने याबाबत उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. या प्रकरणी अपंग सेलचे जिल्हाध्यक्ष डोंगरदिवे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अपंग सेलचे प्रदेशाध्यक्ष सुहास तेंडुलकर यांनी ही माहिती दिली.

Leave a Comment