अरविंद केजरीवालांचा शपथविधी आणि योगायोग

नवी दिल्ली – विधानसभा निवडणुकीत दिल्लीत काँग्रेस ह्यसफाईह्य केल्यानंतर आता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाºया अरविंद केजरीवाल यांनी निश्चित केलेली तारीख २८ डिसेंबर म्हणजे काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. असे घडण्यामागे निव्वळ योगायोग असल्याचे ह्यआपह्यकडून सांगण्यात येत असले तरी काँग्रेसच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच असल्याची चर्चा आहे.

येत्या शनिवारी म्हणजे २८ डिसेंबर २०१३ रोजी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याच दिवशी भारतात काँग्रेसची स्थापना झाली होती. ए. ओ. ह्यूम यांनी २८ डिसेंबर १८८५ मध्ये भारतात काँग्रेसची स्थापना केली होती. केजरीवाल यांच्या ह्यआपह्य ने काँग्रेसवर तगडी मात केल्यानंतर काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. दिल्लीत झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ह्यआपह्यला २८ जागा मिळाल्या आहेत. २८ आकडा आणि ह्यआपह्य यांच्यातील योगायोग हा आता चचेर्चा विषय बनू लागला आहे.