मनमोहनसिंगांनी व्यक्त केली ब्रेक घेण्याची इच्छा

नवी दिल्ली – काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करणार का याची जोरदार चर्चा राजधानीत सुरू असतानाच पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे आगामी निवडणुकांनंतर थोडा ब्रेक घेण्याची इच्छा बोलून दाखविली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मनमोहनसिग यांनी निवडणुकांनंतर पक्षासाठी काम आणि राहुलना मदत व मार्गदर्शन करण्याची इच्छाही याचवेळी प्रकट केली आहे.

अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या या निर्णयाची माहिती कांही वरीष्ठ नेत्यांना आहे. पंतप्रधानांचा हा निर्णय योग्यच असल्याचे त्यांचे मत आहे. या निर्णयामुळे काँग्रेसला राहुल गांधी यांची पोझिशन ठरविण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मतही व्यक्त होत आहे. १७ जानेवारीला काँग्रेस कार्यकारणी समितीची बैठक होत असून त्यात राहुल यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करायचे का या संबंधी निर्णय घेतला जाणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment