राहुल हेच देशातील सक्षम,सर्वश्रेष्ठ नेते: मोईली

मुंबई – देशामधील सर्वांत सक्षम व सर्वश्रेष्ठ नेते असणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान पदासाठी सुयोग्य उमेदवार असल्याचे प्रशस्तिपत्र केंद्रीय पेट्रोलियम वीरप्पा मोईली यांनी दिले आहे. राहुल हेच देशातील सक्षम व सर्वश्रेष्ठ नेते आहेत. कॉंग्रेस पक्षाचे तेच खरे नेते आहेत, असे एका कार्यक्रमासाठी आलेल्या मोईली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राहुल यांची आत्ता या क्षणी देशातील युवा वर्गास गरज असल्याचे मतही मोईली यांनी यावेळी व्यक्त केले. राहुल यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केले जावे, ही पक्षाची व देशाचीही इच्छा आहे. भारतासारख्या देशासाठी राहुलसारख्या सर्वांत विश्वासात घेणाºया व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत, असे मोईली म्हणाले.

नुकत्याच झालेल्या राज्य निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार योग्य वेळी जाहीर केला जाईल, असे काँग्रेस अध्यक्षा गांधी यांनी सांगितले होते. यासंदर्भात काँग्रेस पक्षाच्या येत्या 17 जानेवारी रोजी होणाºया अधिवेशनादरम्यान राहुल यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मोईली यांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तसेच कर्नाटक, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड या राज्यांमध्ये काँग्रस पक्षाला मिळालेला विजय हा केवळ गांधी यांच्यामुळेच मिळल्याचा दावाही मोईली यांनी यावेळी केला.

Leave a Comment