मूड स्कॅन करणारे अॅप

माणसाचे मूड सतत बदलत असतात. कोणत्या वेळी कोणता मूड असेल हे कसे समजणार ? अनेक वेळा स्वतःलाही आपला मूड ओळखू येत नाही तर तो दुसर्‍यांना कसा समजणार ? संशोधकांच्या लक्षातही ही बाब आली असावी यामुळे त्यांनी मूड स्कॅन करणारे अॅप तयार केले आहे. हे अनोखे अॅप केवळ मनोरंजनासाठी आहे. मूड स्कॅन करून त्याचा रिझल्ट देण्यासाठी यात अनेक रंगाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक रंग वेगळा मूड दर्शविणार आहे.

स्मार्टफोनवर हे अॅप वापरता येणार आहे. यात खास ग्राफिक आणि सपोर्टिंग साऊंडची व्यवस्था केली गेली आहे. युजरने एक रंग निवडायचा आणि होम स्क्रीनवर अंगठा ठेवायचा. त्याचे स्कॅंनिंग करून तुमचा मूड कसा याचा रिझल्ट हे अॅप स्क्रीनवरच देणार आहे. हे अॅप डाऊनलोड करण्यासाठी अंॅड्राईड २.२ अथवा त्यापेक्षा अधिक क्षमतेची ऑपरेटिंग सिस्टीम असणे आवश्यक आहे.

Leave a Comment