बिग बी व राज ठाकरे यांच्यातील वाद मिटला

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून बिग बी अमिताभ बच्चन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील संबध ताणले गेले होते. आता मात्र दोघांतील संबध पूर्ववत झाले असून त्या सोमवारी मनसे सेनेच्या कार्यक्रमात बिग बी उपस्थित राहणार आहेत. पाच वर्षांपूर्वी राज ठाकरे आणि बिग बी यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. तो आता काही दिवसांपूर्वी संपताना दिसत आहे.

दोघांच्याा वादावर पडदा पडल्या नंतर २००८ नंतर दोघेजण या शतकाचे महानायक मनसेच्या चित्रपट सेनेच्या सातव्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून येत्या सोमवारी षण्मुखानंद येथे उपस्थित राहणार आहेत. भारतीय सिनेमाच्या १०० वर्षपूर्तीचा आनंद साजरा करण्यासाठी मनसे तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिनेमा आणि संगीत क्षेत्रांतील दिग्गज येणार आहेत.

राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार असे नाही. यापूर्वी २००८ मध्ये राज ठाकरे यांनी आपले काका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर फोटोबायोग्राफी प्रकाशित केली, त्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून अमिताभ बच्चन यांना बोलावण्यात आले होते. त्या वेळी राज ठाकरे शिवसेनेत होते. त्यावेळी दोघांचीपण भेट झाली होती.

Leave a Comment