‘आदर्श घोटाळ्या’चा अहवाल राज्य सरकारने फेटाळला

नागपूर: हिवाळी अधिवेशनात सरकारने हा ‘आदर्श घोटाळ्या’चा अहवाल अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे. ‘आदर्श घोटाळ्या’चा अहवाल राज्य सरकारने फेटाळला आहे.त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

निवृत्त न्यायाधीश जे. ए. पाटील समितीने हा अहवाल सादर केला होता. मात्र या अहवालातील शिफारसी अमान्य करत मंत्रिमंडळाने हा अहवाल फेटाळल्याचे सूत्रांचे म्हणने आहे.या अहवालावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी होती. मात्र ही मागणी डावलून, सरकारने हा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे.

या अहवालात नेमके काय आहे, हे अद्याप कोणालाही माहित नाही. पण सरकारच्या या निर्णयामुळे अशोक चव्हाण यांच्यासह अनेक जणांना दिलासा मिळाला आहे.राज्यपालांनी अशोक चव्हाणांना अभय दिले असले, तरी अशोक चव्हणांची नजर विधीमंडळाच्या शेवटच्या दिवसाकडे होती. कारण अखेरच्याच दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून गुलदस्त्यात असलेल्या आदर्श घोटाळ्याच्या अहवालाचा बॉम्ब फुटण्याची शक्यता होती.

Leave a Comment