नोकियाचा आशा ५०२ अवघ्या ५७३९ रूपयात

नवी दिल्ली – स्वस्त, सहज परवडणारे आणि खात्रीलायक हँडसेट देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नोकेयाने त्याचा आशा ५०२ मोबाईल भारतीय बाजारात सादर केला असून त्याची विक्री ऑनलाईनवर सुरू झाली आहे. ग्राहकांना हा फोन ५७३९ रूपयांत उपलब्ध होणार आहे.

सर्वप्रथम हा फोन नोकिया वर्ल्ड प्रोग्रॅममध्ये दिसला होता त्यावेळी त्यासोबत आशा ५०० व आशा ५०३ हे फोन सादर करण्यात आले होते. आशा ५०२ ला ३ इंची एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे तसेच ५ मेगापिक्सलचा कॅमेराही त्यात अंतर्भूत आहे. ड्युवेल सिमसह असलेला हा फोन इझी स्वीप टेक्नॉलॉजीसह असला तरी यात फुल साईज सिम लावता येणार नसल्याचे समजते.

Leave a Comment