गॅलॅक्सी एस पाच येणार आय स्कॅनिंग सेन्सरसह

गॅलॅक्सीचा नवा एस पाच स्मार्टफोन आय स्कॅनिंग सेन्सरसह येत असून हा स्मार्टफोन फेब्रुवारीत बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. आजपर्यंत कोणत्याच फोनसाठी हे तंत्रज्ञान वापरले गेलेले नाही. या फोनसाठी ग्राहकांना ५५ ते ६० हजार रूपये मोजावे लागतील असेही सागितले जात आहे.

यापूर्वी सॅमसंगच्या प्रतिस्पर्धी कंपन्या अॅपल व एचटीसीने फिंगर प्रिंट स्कॅनरसह फोन लाँच केले आहेत. यात बोटाचा ठसा जुळल्यानंतर फोन अनलॉक होतो. गॅलॅक्सी एस पाच मध्ये युजरच्या डोळ्यातील बुबळाचे स्कॅनिंग केले जाणार असून ही प्रतिमा डेटाबेसमध्ये नोंदविली जाणार आहे. त्यामुळे युजरला फोन अनलॉक करण्यासाठी तो डोळ्यांसमोर धरावा लागणार आहे. अर्थात युजरच्या बुबळाची प्रतिमा जुळली तरच फोन अनलॉक होणार आहे.

Leave a Comment