नवी दिल्ली – लोकसभेच्या निवडणुका आता दारात आल्यानंतर राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी अंबानी, मित्तल, बिर्लांसहीत अनेक बड्या उद्योगसमुहांनी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन केले आहेत. पंचवीसहून अधिक औद्योगिक समुहांनीही असे ट्रस्ट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या नव्या ट्रस्ट ची नोंदणी नव्या नियमानुसार केली जाणार आहे असे समजते.
यावर्षीच सरकारने औद्योगिक संस्था आणि उद्योग समुहांना राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी स्वतंत्र ट्रस्ट स्थापन करावेत असा नियम लागू केला आहे. यामागे राजकीय पक्षांना मिळणार्या देणग्यांत पारदर्शकता असावी असा उद्देश आहे तसेच या उद्योगांना देणग्या दिल्यानंतर त्यावर करात सवलतही दिली जाणार आहे. त्यानुसार मोठ्या उद्योगसमुहांनी ट्रस्ट स्थापन केले आहेत मात्र त्यांची नांवे निवडताना कोणत्या उद्योगसमुहाचा हा ट*स्ट आहे हे कळणार नाही अशी दक्षता घेतली आहे.
वेदांता समुहाने जनहित नावाने, भारतीने सत्य इलेक्टोल ट्रस्ट, रिलायन्सने पिपल्स इलेक्टोल ट्रस्ट, तर बिर्ला समुहाने समाज इलेक्टोल ट्रस्ट या नावांनी हे ट्रस्ट स्थापन केले असल्याचे समजते.