संध्या सिंग हत्येप्रकरणी मुलाला अटक

मुंबई- संध्या सिंग हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा रघुवीर सिंग सोमवारी पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. मुंबई गुन्हे प्रकटीकरण कक्ष सहा कार्यालयात रघुवीर सिंग शरण आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

विशेष म्हणजे रघुवीर सिंगने सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी रघुवीर सिंगचे तब्बल १७ वेळा चौकशी केली होती. मात्र तो तपासा दरम्यान सहकार्य करत नव्हता. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक संगीतकार जतीन-ललित यांची बहिण संध्या सिंग या १३ डिसेंबर २०१२पासून बेपत्ता होत्या. नेरुळमधील एनआरआय कॉलनीतील घरातून पडलेल्या संध्याचा मृतदेह तब्बल १५ दिवसांनी खाडीकिनारी सापडला होता. विशेष म्हणजे या प्रकरणाचा तपास करताना सात गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले होते. यात हत्या व चोरीसारख्या गुन्ह्यांचा समावेश होता.

Leave a Comment