औषध विकेत्यांचा संप मागे

मुंबई- औषध विकेत्यांनी पहिल्याच दिवशी आपला तीन दिवसांचा संप मागे घेतला आहे. यामुळे राज्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) होत असलेल्या कारवाईविरोधात राज्यातील सुमारे ५५ हजार औषध विक्रेते आजपासून तीन दिवसांच्या संपावर गेले होते. या संपकाळात रुग्णांना औषधे मिळावीत यासाठी एफडीएने कंबर कसली होती.

काही रुग्णालयांमध्ये औषध निरीक्षक तैनात करण्याबरोबर संपात सहभागी न होणा-या औषध विक्रेत्यांना पोलिस संरक्षण देण्याचा निर्णय एफडीएने घेतला. त्याचबरोर औषध विक्रेत्यांची इच्छा नसताना त्यांच्यावर दबाव टाकून संपात सामील होण्यास भाग पाडणा-या व उठसूट संप करणा-या औषध विक्रेत्या संघटनेच्या नेत्यांवर मोक्का किंवा मेस्माअंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ह्ययुनियन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिटीसह्णने केली. यामुळे संपकरी विक्रेत्यांवर दबाव वाढला होता.

Leave a Comment