शाहरुख आणि फरहान एकत्र काम करणार

अनेक दिवसानंतर शाहरूख खान आणि फरहान अख्तर एकत्रित काम करताना दिसणार आहेत. ब-याच दिवसांनतर फरहान सिनेमात काम करताना दिसणार आहे. यापूर्वी ‘डॉन’ आणि ‘डॉन २’साठी या शाहरुख आणि फरहानने एकत्र काम केले होते. पण, त्यावेळी फरहान निर्मात्याच्या भूमिकेत होता. मात्र, आता शहरुख आणि फरहानचे चाहते या दोघांनाही एकत्र रुपेरी पडद्यावर काम करताना पाहू शकणार आहेत.

आगामी काळात बादशाह शाहरूख खान आणि फरहान अख्तर आता एकाच सिनेमात काम करताना दिसणार आहेत. राहुल ढोलकियाच्या ‘रईस’ या सिनेमात हे दोघे दिसतील. या चित्रपटात शाहरुख एक गुजराती भूमिका साकारताना दिसेल. तसेच, फरहानही चित्रपटात प्रमुख भूमिकेत साकारताना दिसले. हे दोघेही पहिल्यांदाच एकत्र चित्रपटात काम करत आहेत.

चित्रपटात अवैध दारू विकणा-या व्यवसायिकाची भूमिका शाहरूख करणार आहे, तर फरहान पोलिसाची भूमिकेत दिसले. रईसच्या शुटचे काम पुढील वर्षी सुरु होणार असून, २०१५ साली चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment